‘नाळ’ चित्रपटाला दिल्या सुबोध भावेने शुभेच्छा.. त्याच्या ह्या प्रोत्साहनपर भूमिकेचे कौतुक

images
images
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रपटनगरी | स्वतःचा चित्रपट चित्रपटगृहात सुरू असतानांही अभिनेता सुबोध भावेने ‘नाळ’ या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या ह्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे की, “मला खात्री आहे की मराठी प्रेक्षकांची सिनेमाशी नाळ जोडण्यात ‘नाळ’ चित्रपटाची संपूर्ण टीम यशस्वी होईल… एका अनुभवासाठी सज्ज व्हा..आजपासून सिनेमा गृहात… सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा..!”

त्याच्या ह्या शुभेच्छा संदेशामुळे नेटिजन्सने फार कौतुक केले आहे. अनेक नेटिजन्सने त्याच्या ह्या प्रोत्साहनपर भूमिकेवर पुढील प्रतिक्रिया दिल्या आहेत, “याला म्हणतात खरा अभिनेता, स्वतःचा चित्रपट अजूनही चालू असताना दुसऱ्या एका मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देतो आहे. मानल तुला सुबोध दादा…” , “तुम्ही खरच मोठ्या हृदयाचे व्यक्ती आहात. स्वतःचा चित्रपट, सध्या चित्रपटगृहात चालू असताना सुद्धा, तुम्ही प्रेक्षकांना, तुमच्या मित्राचा चित्रपट पहायचे आवाहन करत आहात. खूप छान…” .

‘एक सांगायच’ हा लोकेश गुप्ते यांचा चित्रपट सुद्धा काल प्रदर्शित झाला असून सुबोधने ह्या चित्रपटाला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आणि डॉ.काशीनाथ घाणेकर’ हा चित्रपट सध्या त्याचा सुरू आहे व हा चित्रपट बरीच गर्दी खेचत आहे. खुप दिवसानंतर आलेल्या ह्या चित्रपटाचे व त्यातील कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1063297831660912640?s=19