नाशिक प्रतिनिधी | नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ पावसान उघड दिली होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना चांदवड, दिंडोरी, कळवण, निफाड व नाशिक तालुक्यात पावसान दमदार हजेरी लावली. पण पावसाचा जोर इतका होता की यामुळं द्राक्षबागांचे मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पावसाची वाट पाहत असताना दुपारनंतर दमदार पावसाला सुरवात झाली. चांदवड तालुक्यात वडणेर भैरव, धोंडगव्हान परिसरात मुसळधार पाऊस झाला. काही क्षणात पावसाचा वेग वाढल्याने ओढे-नाले एक झाले. काही काळ धोंडगव्हाण व पाचोरे वणी या गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे या परिसरातील द्राक्षे पिकाच मोठ नुकसान झालय. या पावसामुळ द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली असून त्यांनी धास्ती घेतलीये. त्यात काही शेतकऱ्यांनी छाटण्यांची सुरवात केली असून हंगाम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर पावसान नुकसान केलय.
अनेक ठिकाणी टोमॅटो, द्राक्ष व काही ठिकाणी भाजीपाला पिक गुडघाभर पाण्यात गेली. त्यामुळ आगामी उत्पादनावर परिणाम तर होणारच आहे. मात्र, शेतकऱ्यांनी केलेला खर्च काही वाया जाण्याची शक्यता आहे.