नवी दिल्ली | मागील काही दिवसापासून सुरू असलेला अवजड वाहनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उच्चस्तर समिती नेमल्याने संप मागे घेत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेल दरवाढ, महामार्गावर पोलिसाकडून केली जाणारी पिळवणूक, आर.टी.ओ. अधिकाऱ्याकडून केली जाणारी छळनुक या मुद्द्यावर अवजड वाहन चालक संघटनांनी संप पुकारला होता. नितीन गडकरी यांनी संपकऱ्यांशी बातचीत केल्यावर संपकऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. उच्चस्तर समितीने अहवाल दिल्यावर संपाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला आहे.