पटना |देशभरात लोकसभा निवडणुकांच्या पुर्वतयारीचे वारे वाहू लागले अाहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. २०१९ च्या निवडणुकांची व्युहरचणा करण्यासाठी शहा दौर्यावर आहेत. दरम्यान शहा यांनी संघटन बांधनीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश राज्य भाजपला दिले आहेत. नितीश कुमार आणि अमित शहांची आजची भेट यासंदर्भात महत्वपूर्ण ठरली आहे. पटना येथे झालेल्या बैठकीत भाजप आणि जदयु यांच्यात युतीची रणनिती ठरवण्याबद्दल विस्तृत चर्चा झाली आहे. परंतु अद्याप कोणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यावेळी वाटाघाटीच्या बर्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. ‘भ्रष्टाचारी लोकांच्या सोबत नितीश बाबू राहू शकत नव्हते म्हणून ते आमच्या सोबत आले आहेत’ असे सुचक विधान यावेही अमित शहा यांनी केले आहे. तसेच ‘भाजपला छोट्या पक्षाना सोबत घेऊन जायचं समजत. तेव्हा कृपया विरोधकांनी नितीशकुमारांच्यासाठी लाळ घोटने सोडून द्यावे’ असे म्हणुन शहा यांनी विरोधकांच्यावर तोंड सुख घेतले आहे.