दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील गुन्हेगार मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्या.अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना असे मत मांडले की गुन्हेगारांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर तेव्हाच पुनर्विचार केला जातो जेव्हा कायद्यात काही त्रुटी असतात. कायदा अगदी सक्षम असल्याने आम्ही ही याचिका फेटाळत असल्याचे न्यायपीठाने यावेळी म्हणले आहे.
निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना ‘सत्याचा विजय झाला पण शिक्षेची अंमलबजावणी होण्यास उशीर होतो आहे’ असे मत मांडले आहे.