दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिली आहे. परंतु मुकेश (२९), पवन गुप्ता (२२)आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजी पॅरामिल्ट्रीची विद्यार्थिनी निर्भया हिच्यावर चालत्या गाडीत बलात्कार करून अत्यंत हिंस्त्र पणे तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्या सोबत असलेल्या मित्राला ही बेदम मारहाण करून त्यालाही जखमी करण्यात आले होते. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला त्यांना टाकून देण्यात आले होते. त्यानंतर देश भर या दोषींच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले होते. पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीची तरुणाई रस्त्यावर उतरली होती.
या खटल्यातील आरोपी राम सिंह ने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली होती. अन्य एक आरोपी सज्ञान नसल्याने अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधार गृहात पाठवले होते. तर बाकीच्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ति आर भानुमति आणि न्यायमूर्ति अशोक भूषण यांच्या न्यायपीठा व्दारे आज निकाल जाहीर करण्यात येणार आहे.