अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे.
काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण संचालनालयाच्या सुविधांचा वापर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार निवडणुकी दरम्यान रोख व इतर मौल्यवान वस्तूंच्या देवाण घेवाणीवर राज्य व इतर केंद्रीय विभागाच्या समन्वयाने देखरेख करणारी सक्षम यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.
नागपुरात प्रधान प्राप्तीकर संचालकांच्या कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले. मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी व काळ्या पैश्याचा वापर रोखण्यासाठी कुठलाही गैरव्यवहार होत असल्याच आढळल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. कुठेही पैसे किंवा मौल्यवान वस्तूंच वाटप होत असल्यास कार्यालयातील कंट्रोल रूमच्या 1800 233 3785 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 94033 91664 या व्हाटस ॲप क्रमांकावर किंवा फॅक्स क्रमांक (0712) 2525844 माहिती द्यावी, असे आवाहन नन्नावरे यांनी केले आहे.