नागपूर | सरकारी नोनकीमधे आता मराठा समाजाला १६ % आरक्षण मिळणार आहे. ‘राज्य शासनाच्या मेघा भरतीत मराठा समाजासाठी १६% जागा राखीव राहतील. उच्च न्यायालयाचा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर ह्या जागा भरण्यात येतील, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी विधान परिषदेत काल केली आहे.
मराठा अरक्षणाबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी या धनंजय मुंडे आणि विनायक मेटे यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री विधान परिषदेत बोलत होते. उच्च न्यायालयाने निकाल दिल्या नंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा सक्रिय झाला असून परळी या ठिकाणी दोन दिवसा पासून मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विधीमंडळात चर्चेची मागणी करण्यात आली होती.