सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोधळे
काँग्रेसचे जेष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे जावई काँग्रेसचे कार्यकर्ते महेंद्र लाड यांचा संघाच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पतंगराव कदम यांच्या जावयांना संघाच्या शाखेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पलूस शाखेच्यावतीने दसरा संचालन आज संपूर्ण शहरामधून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महेंद्र लाड हे होते आणि प्रमुख वक्ते प्रसाद देशपांडे हे होते. मात्र एकीकडे काँग्रेसचे एकनिष्ठ असणाऱ्या कदम घराण्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता असणाऱ्या जावयाला संघाच्या व्यासपीठावर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एवढच नाही तर संघाच्या कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मोडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी कधीच संघाच्या व्यासपीठावर तसेच कार्यक्रमांना जाणे पसंत केले नाही. त्यांनी संघाला आपल्या पासून नेहमीच दूर ठेवले. कदम कुटुंबीय हे काँग्रेस विचारसरणीशी नेहमीच एकनिष्ठ राहिले आहे. पतंगराव कदम यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांनी हि एकनिष्ठेची परंपरा कायम ठेवली आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. त्यातच विश्वजित कदम हे पलूस कडेगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विश्वजित कदम हे सरकारच्या विरोधी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र त्यांचेच मेहुणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून संचालन करतात त्यामुळे त्यांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे. अशातच त्या’ कार्यक्रमाचे फोटो सोशल मोडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने कदमांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याशी शक्यता असून पक्षश्रेष्टीं हि नाराज होण्याची शक्यता आहे.
खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा
वाचा सविस्तर – https://t.co/98s6xI6NKz@INCMumbai @bb_thorat @IYC #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
भौतिकशास्त्रातील यंदाचं नोबेल कॉस्मोलॉजीसाठी;
वाचा सविस्तर – https://t.co/8Fq37rmLgr@NobelPrize @PhysicsToday @PhysicsWorld @ScienceNews #NobelPrize #physics
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 8, 2019
आरे येथे काल रात्री शासनाने वृक्षतोड केली. वृक्षतोडीनंतर अशाप्रकारे श्रद्धांजली वाहून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला.#savearey#hellomaharashtra @NCPspeaks @supriya_sule @Awhadspeaks @MumbaiNCP @mybmc pic.twitter.com/mA3SmVKktG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 5, 2019