पाकिस्तानात चीनी दूतावासाबाहेर गोळीबार, दोन ठार

Chinies Ambassy in Pakistan
Chinies Ambassy in Pakistan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराची | पाकिस्तानमदील चीनी दूतावासाजवळ गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. कराचीतील क्लिफटन भागात काही लोकांनी चीनी दूतावासाजवळ गोळ्यांचा आवाज ऐकला. या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूतावासाजवळ उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांनी उत्तरादाखल हल्लेखोरांवर गोळ्या झाडल्या आहेत. सांगितले जात आहे की, दूतावासातील सर्व लोक सुरक्षित आहेत.

दूतावासाजवळ राहत असलेल्या स्थानिक लोकांनी तेथील वृत्तवाहिन्यांना माहिती दिली की, त्यांनी आज सकाळी दूतावास परिसरात गोळ्यांचा मोठा आवाज ऐकला. दरम्यान, हा हल्ला आहे की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही असे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.