लातूर प्रतिनिधी | पाणी टंचाईच्या भीषण समस्येस तोंड देत असलेल्या लातूरकरांसमोर गणेश मूर्तींचे विसर्जन कसे करायचे हा मोठा प्रश्न होता. पाऊस न पडल्याने अखेर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन लातूरकारांना केले. या आवाहनास लातूरकारांनीही भरभरून प्रतिसाद दिला. विसर्जनासाठी पाणीच नसल्यानं अनेकांनी मूर्तींचे दान केले.
शहरात एकूण ३२५ मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली होती. मात्र, पाणी टंचाई असल्यान शांतता कमिटीच्या बैठकीतच हा प्रश्न उपस्थित झाला होता. गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पडेन अशी अपेक्षा होती मात्र पावसाची अवकृपा कायम राहिली आणि लातूरकरांना मूर्तीच दान करावे लागले. यासाठी शहरात पाच ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. यामध्ये मोठ्या गणपतींची संख्या जवळपास १०० तर लहान आणि घरगुती ३५०० गणेशमूर्ती दान करण्यासाठी जमा करण्यात आल्या होत्या.
जागोजागी जिल्हा प्रशासनाने मूर्ती दानाचे आवाहन केले होते. सध्याची स्थिती आणि पावसाची अवकृपा लक्षात घेता लातूरकारांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला मूर्ती दान केल्या. त्यामुळ जलसंवर्धन झालच आहे. शिवाय पर्यावरणाची हानीही टळली असल्याची भावना लातूरकर व्यक्त करतायेत.
इतर महत्वाच्या बातम्या –
भास्कर जाधव म्हणजे सत्तेची चटक लागलेला माणूस : नवाब मलिक
उदयनराजे यांनी केली भाजप ‘प्रवेशाची’ अधिकृत घोषणा; म्हणाले, लढाई ‘रयतेच्या विकासासाठी’
उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणापक्षाने उमेदवारी दिली तर लढेन -शिवसेना प्रवेशानंतर ‘भास्कर जाधव’ यांची प्रतिक्रिया
कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार