पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे
आगामी येत्या नव्या वर्षांत पीएमपीत ४०० गाड्या समाविष्ट होणार असुन ज्यांचे आयुर्माण संपले आहे. अशा शंभर ते दीडशे गाड्या बंद करण्यात येणार आहे. यामुळे संख्येत पुन्हा कमतरता जाणवनार आहे. त्यामुळे नव्या गाड्या मिळूनही पीएमपीत घट राहण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकसंख्या पाहता आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपी’कडून दैनंदिन प्रवासी सेवा दिली जाते.
पीएमपीच्या मालकीच्या गाड्यांचे आयुर्मान संपल्यानंतरही या गाड्या रस्त्यावर धावतात. त्यामुळे शहराच्या प्रदूषणावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे नव्या गाड्या दाखल झाल्यानंतर शंभर ते दीडशे गाड्या वाहतूकीतुन बंद करण्यात येतील.