पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तान मोतीचूर बुंदीचा तब्बल १७५ किलोचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण केला. ४८ तासांत ६ व्यक्तींच्या मदतीने हा लाडू बनवण्यात आला आहे. पुण्यातील निखिल मालानी यांच्या मार्फत हा १७५ किलोचा लाडूचा प्रसाद गणपतीला अर्पण करण्यात आला आहे.
४८ तासांत ६ कारागिरांच्या मदतीने हा लाडू बनविण्यात आला. हा १७५ किलोचा लाडू भाविकांच आकर्षण बनला असून हा प्रसाद पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच उत्सव काळात बापाच्या चरणी वडगाव मावळ येथील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी दोनच दिवसांपूर्वी काका हलवाईचे महेंद्र गाडवे आणि युवराज गाडवे यांच्याकडून १५१ किलोचा मोदक बनवून तो दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केला होता. हा काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यांसह चांदीचे वर्क केलेला मोदक सलग आठ तासांच्या मेहनतीनंतर १५ कारागिरांच्या मदतीने तयार करण्यात आला होता.