पुणे : डॉक्टर ला नेहमी देवाचा दर्जा दिला जातो. रुग्णांची सेवा करण्यातच डाॅक्टरांचे सारे आयुष्य खर्ची जाते. रुग्नांची सेवा करणार्या डाॅक्टरांमधे असेही काही निवडक डॉक्टर असतात जे समाजाच्या आर्थिक बाजुचा विचार करून अल्पशा फी मधे आपली सेवा अविरतपणे चालु ठेवतात. अशाप्रकारे वैद्यकीय व्यवसाय करत आपले सामाजिक भान जपणार्या विशेष डाॅक्टरांना दिला जाणारा “जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन अवाॅर्ड २०१८” पुण्यातील डॉ. वसंत रामजी चंदन यांना जाहीर झाला आहे. डाॅक्टर्स डे च्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रामधे विशेष काम करणार्या निवडक डॉक्टरांना ‘जनरल प्रेक्टिशनर्स असोशियेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी या विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते.
‘आजचा सत्कार हा कुलवंतांचा सत्कार आहे असे मी मानतो. गेली २५ वर्ष मी जी.पी.एस सोबत आहे. श्रमाशिवाय फळ मिळत नाही हे खरेच आहे. मला या पुरस्कार रुपानर माझ्या श्रमाचे फळ मिळाले आहे. त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ कनिष्ठ सहकाऱ्यांचा आभारी आहे.’ असे म्हणत डॉ.वसंत रामजी चंदन यांनी भाषणातून सर्वांचे आभार मानले. आयुष्यात अनेक चढ़ उतार आले. त्या चढ़ उतारात मला माझ्या पत्नीची साथ मोलाची ठरली. आज मी जे काही कमावले आहे ते शिक्षणामुळे आहे असे म्हणत त्यांनी शिक्षणाचे महत्व आधोरेखीत केले. दरम्यान विज्ञान शाखेच्या विशेष विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. अध्यक्षपदी श्री. प्रवीण दरक उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कपिल बोरावके व संजय अरोरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवाजी कोल्हे यांनी केले तर समारोप डॉ हरिभाऊ सोनवणे यांनी केला.
(वृत्तांकन – सुनिल शेवरे)