पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला विधानसभेचा अर्ज, लोकसभा की विधानसभा दोन दिवसांत ठरवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने विधानसभांसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही जाहीर झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोणाला निवडणुक रिंगणात उतरवायचे यावर मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढवणार असल्याचं बोललं जात होतं. चव्हाण यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावाही त्यानिमित्त आयोजित केला होता. मात्र आज पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचा अर्ज घेतल्याने चव्हाण कराड दक्षिन मधून विधानसभा लढणार असल्याचं बोललं जातंय. मात्र आपण केवळ अर्ज घेऊन ठेवला असून विधानसभा की लोकसभा हा निर्णय पुढील दोन दिवसांत घेणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढणार नसले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हेच उदयनराजेंविरोदात लोकसभा निवडणुक लढणार असल्याचं सुत्रांकडून कळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाटील यांना तसे आदेश दिल्याचंही समजत आहे. पवार यांनी पाटील यांना एबी फोर्म दिला असून गरज पडली तर तुम्हालाच लोकसभा लढवावी लागेल असं पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना सांगितले आहे.

यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मधून विधानसभा लढवणार की उदयनराजेंविरोधात सातारा लोकसभा हे अजून गुलदस्त्यात आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

Leave a Comment