औरंगाबाद प्रतिनिधी | दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यामध्ये अखेर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमाने उड्डाण घेतं दिसत आहेत. रविवारी देखील औरंगाबाद विमानतळावरून ‘क्लाउड सिडिंग’ करण्यासाठी विमाने उड्डाण घेतले. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला.
विमानाच्या साहाय्याने ढगात ‘क्लाउड सिडींग’ करण्यात आले. या नंतर काही तासाने पैठण तालुक्यातील गोपवाडी भागात दमदार पाऊस झाला.
या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मराठवाड्यात पोषक ढग दिसल्यास त्या ढगात रसायन फवारणी करून हा प्रयोग केला जात आहे. मराठवाड्यामध्ये ढगात ठिकठिकाणी विमान घिरट्या घालताना सध्या दिसत आहे.
दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयावर डॉप्लर रडार इन्स्टॉलेशन बसविण्यात आले असून प्रयोगासाठी सी-९० बनावटीचे विमानही औरंगाबाद सध्या उपलब्ध आहे. एकीकडे राज्यभर जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे, तर दुसरीकडे कोरड्या मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा असल्याने येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार येत आहे. काल या प्रयोगाची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यांनतर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला.
सध्या आयुक्तालयाच्या तिसऱ्या मजल्यावर कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून या कंट्रोल रूममध्ये प्रयोगासाठी नियुक्त करण्यात आलेले तीन अधिकारी हवामानाचा अंदाज, योग्य ढगांची माहिती तसेच ‘प्लाइट प्लान’ तयार करतात. पाऊस पाडण्यायोग्य ढगांची माहिती वैमानिकाला पाठवण्यात येऊन हा प्रयोग राबवण्यात येतो. दररोज सकाळी ११ वाजता या प्रकारची बैठक होऊन विमान उड्डाणासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर कृत्रिम पावसासाठी प्रयोग राबवण्यात येत आहे.