प्रतिनिधी रायगड |अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयात अधीकारी विश्रामगृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खलबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा पोलिस दल हादरून गेले आहे. मात्र प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली? याबाबत स्पष्ट कारण कळलेले नाही. प्रशांत कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.
प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वीच मुंबईवरून अलिबाग येथे तीन महिन्यात अर्ज शाखेत रुजू झाले होते. कामावर रुजू झाल्यानंतर ते काही दिवस रजेवर गेले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते. दरम्यान काल पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या या आत्महत्येने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा
गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण
राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?
कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक