पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड़ यांच्या बदली विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन

0
80
unnamed file
unnamed file
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुनिल शेवरे

कोंढवा पोलीस स्टेशन चे पोलिस निरिक्षक मिलिंद गायकवाड़ यांनी ५० लाखांच्या खंडणी प्रकरणी धड़क कारवाई करत हड़पसर विधानसभेचे आमदार योगेश टीळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. कारवाइनंतर ४८ तासांच्या आत त्यांच्या बदली चे आदेश निघाले. ‌राजकीय सत्तेचा गैरवापर हे सरकार करीत असून त्याच दबावाने लगेचच बदली करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी ने केला आहे.

राष्ट्रवादी शहर ने जिल्हाधिकारी कार्यालया सामोर आंदोलन केले. यावेळी शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील, तसेच आदि शहर कार्यकारिणी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरकार विरोधात नारे देण्यात आले. दुटप्पी सरकार चा निषेध असो म्हणत हे आंदोलन झाले.

कोढवा पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यातुन नकळत अश्रु

‌कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या गायकवाड़ यांनी आपली कर्तव्य बजावले, असा अधिकारी महाराष्ट्रात जन्माला आला आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ठ आहे अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतुन व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here