टीम, HELLO महाराष्ट्र | आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे काहीच दिवसात आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकांची जोरदार तयारी सुरु असेल पण आता बाप्पाला १० दिवस नैवेद्यासाठी काय बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. यासाठी आम्ही आज अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने खोबऱ्याचे मोदक कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहोत.
साहित्य :
१)खोबरे एक वाटी
२)रवा अर्धी वाटी
३)खवा अर्धी वाटी
४)साखर १ वाटी
५)तूप
कृती –
१)यासाठी अगोदर मैदाची कणीक मळून घ्या.
२) नंतर खोबरं खवून घ्या.
३) हे खवलेलं खोबरं, रवा, खवा, साखर एकत्र करून त्याच सारण तयार करा.
४) आता मळलेली कणीक घेऊन त्याच्या पाऱ्या तयार करा आणि त्यामध्ये सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या.
५) हे तयार मोदक मंद आचेवर तळून घ्या.
६) असे हे सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी मैद्याचे आणि खोबऱ्याचे मोदक तयार करू शकतो.