बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिप क्षीरसागर आणि त्यांचे चुलते भारतभुषण क्षिरसागर यांच्यातील वाद पुन्हाएकदा चव्हाट्यावर आला आहे. बीड नगरपरिषदेत भारतभुषण यांच्या गटाची सत्ता आहे. चक्रधरनगर भागात सत्ताधारी गटाच्या स्थानिक नगसेवकाने रस्ता – नाले आदी विकास कामांचा भुमिपूजन कार्यक्रम आयोजित केला होता. नगराध्यक्षांच्या शुभहस्ते रस्त्याचे भुमिपूजन होणार होते. परंतु नियोजित कार्यक्रमाच्या काहीवेळ अगोदर काकू नाना विकास आघाडीचे संदिप क्षीरसागर विरोधी गटाच्या नगरसेवकांना घेऊन तेथे दाखल झाले. ‘शहरातील विकास कामांचे श्रेय विरोधकांनाच जाते आणि त्यामुळे अशा विकास कामांचे भुमिपूजनही आम्हीच करणार’ असा पवित्रा घेत संदिप क्षीरसागर यांनी नारळ फोडून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. विरोधकांमुळेच शहराचा विकास होत असल्याचा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी सत्ताधार्यांवर केला. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्मान झाले होते. विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची बीड शहरातील ही पहीलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
Home ताज्या बातम्या बीडमधे विकास कामाच्या भुमिपूजनावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, संदिप क्षीरसागर यांनी...