भाजप भावनिक मुद्दे काढेल, आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर निवडणुक लढणार – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजप भावनिक मुद्दे काढेल पण आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यांवर निवडणुक लढणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. कराड येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद सांधला. त्यावेळी ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

आता लढत विचारांची आहे असं म्हणत सातारा लोकसभेचा निकाल मतदारांच्या मनात आधीच लागलेला आहे असंही चव्हाण यांनी सांगितलं. ही भुमी क्रांन्तिकारकांची भुमी आहे. इथला मतदार यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना साथ देईल असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.