भुजबळ येवल्यातून लढणार ; पक्ष कोणता ते अजून गुलदस्त्यात

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर बोलण्यास त्यांनी टाळले. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

छगन भुजबळ गणपती उत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले. भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here