पुणे : मल्टिप्लेक्स थिएटर मधे वाढीव दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्या मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांनी मारहान केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पी.व्ही.आर. माॅलमधे हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी माॅलमधे येऊन तोडफोड केली असल्याचे समजत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने थिएटरमधे चढ्या दराने खाद्य पदार्थ विकण्यास मनाई केलेली असताना सुद्धा या मल्टिप्लेक्समधे वाढीव किंमतीने खाद्यपदार्थ विकले जात असल्याचा आरोप मनसेने यावेळी केला आहे. ५ रुपये किंमतीचे पाॅपकाॅर्न २५० रुपये किंमतीला विकले जात असून असे करणे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे मनसेने म्हणले आहे. “आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल मॅनेजरला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मला मराठी समजत नाही असे तिरसट उत्तर आम्हला मिळाले. त्यामुळे आम्हाला मनसे स्टाईल आदोलन करावे लागले” असे मनसे नेते किशोर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले आहे.
मनसे कार्यकर्त्यांवर चतुर्शुंगी पोलीस ठाण्यामधे तोडफोड केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन कोणालही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
Home ताज्या बातम्या मल्टिप्लेक्समधे मनसे कार्यकर्त्यांचा राडा, खाद्यपदार्थांच्या वाढीव किंमतींविरोधात ‘मनसे स्टाईल’ आंदोलन