मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोणत्याच पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आज अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रथम सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन भाजपला पाठिंबा न दिल्याने भाजपला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले परंतू काँग्रेस कडून पाठींबा न मिळाल्याने शिवसेनेलाही सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी मंगळवार संध्याकाळी ८:३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली. मात्र तद्पूर्वीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सक्षम पक्ष सत्तास्थापनेचा दावा करु शकतो.