माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

2
22
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी |माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पाय धरून यांचे आशीर्वाद घेतले आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला १ लाख मतांचे मताधिक्य मिळाल्यानेच भाजपचा उमेदवार विजयी झाला. याचीच जाणीव ठेवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचे पाय धरून आभार मानले आहेत.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चांगलीच लढत झाली. माढा आणि करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादीला मिळालेले मताधिक्य माळशिरस मतदारसंघाच्या भाजपच्या मताधिक्याने भुईसपाट केले तर मान खटाव तालुक्यांनी देखील ५० हजाराच्या जवळपास भाजपला मताधिक्य दिले. त्यामुळे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर ७५ हजारांच्या फरकाने निवडणूक जिंकू शकले.

निकालाचे चित्र आज भाजपच्या बाजूने असले तरी हा करिश्मा फक्त विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुत्सद्दी धोरणामुळे घडू शकला आहे. त्यामुळेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय संपादित करताच विजयसिंह मोहिते पाटलांचे अकलूज येथील निवास स्थान शिवरत्न बंगला गाठला.अकलूज मध्ये येवून रणजितसिंहानी विजयसिंहांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here