मोहिते- पाटील घराण्याला राजकारणात इतक महत्व का दिलं जातं? पहा 3 मोठी कारणे

mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरत्न. सोलापूरच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या (Mohite- Patil Family) या ऐतिहासिक बंगल्यात शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या त्रिकुटाची भेट झाली. मोहिते पाटलांनी घर वापसी करत माढ्यातून लोकसभेसाठी उतरण्याचा निर्णय यावेळेस झाला. निवडणुकांचा हंगाम पाहता अनेक राजकीय नेत्यांचं विरोधी पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना, मोहिते पाटील यांनी मात्र … Read more

माढ्यात शरद पवार डाव टाकणार? मोहिते पाटलांना जवळ करत भाजपला धोबीपछाड देणार?

madha sharad pawar mohite patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha 2024) भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर याना पुन्हा एकदा लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल त्यांच्या घरी समर्थकांची बैठक सुद्धा पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला अजित पवार गटातील रामराजे … Read more

मोहिते-पाटलांचे सहकार क्षेत्रावरील वर्चस्व बबन शिंदेंनी काढले मोडीत, ‘विजय शुगर’ मिल केली मालकीची

ल्या सहा-सात वर्षांपासून तब्बल १८३ कोटींची थकबाकी असलेला करकंब येथील विजय शुगर हा कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी लिलावात काढला. या लिलावामध्ये माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी या कारखान्यासाठी १२५ कोटी १० लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे बँकेचा एनपीए झपाट्यान कमी झाला.

आपला हर्षवर्धन पाटील व्हायला नको म्हणून भालकेंचा गपगुमान राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या बातम्या येत असताना त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भालके सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. तर आघाडीत पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे उचित समजले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपलाच धक्का बसला आहे. भारत भालके यांनी २००९ साली राष्ट्रवादीचे उमेदवार तत्कालीन कॅबनेट … Read more

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे जर माढ्यातून निवडणूक लढले असते तरी त्यांचे डीपॉझीट जप्त करून दाखवले असते, असा खोचक टोला जयसिंह मोहिते पाटील यांनी लगावला आहे. सहकार महर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातीलच उमेदवार असावा, अशी भूमिका स्पष्ट केली … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

सोलापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीला आणखी एक मोठा राजकीय हादरा बसणार असे संकेत मिळत आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पूर्वीपासून निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत. हर्षवर्धन पाटलांनी आज बुधवार दि. ४ रोजी अकलूज येथे जाऊन विजयदादा यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद … Read more

विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेस आघाडीला आणखी एक धक्का देणार

अकलूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थापनेपासून राहीलीले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये आणण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. आज इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये १ तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आपल्या गावी म्हणजे बावड्याला रवाना … Read more

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. मोहिते पाटील घरण्यासोबत संबंध सुधारून बबन शिंदे भाजपच्या तिकिटावर मुलाला आमदार करण्याच्या खटपटीत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी … Read more

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अकलूज प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारात शेवटपर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐन वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर खाट मारून भलत्याच नेत्यांना मंत्रीपदे देण्यात आली. अशा सर्व राजकीय स्थितीत जुलै महिन्यात होणाऱ्या राज्यपालांच्या निवडीत विजयसिंह मोहिते पाटील यांना हिंदी भाषिक राज्यात राज्यपाल बनवले जाईल अशी माहिती वारंवार पुढे येत होती. मात्र … Read more

आनंदीबेन पटेल नव्या राज्यपाल

नवी दिल्ली |  नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारमध्ये राज्यपालांच्या बदल्या केल्या जाणार हे निश्चित होते. त्याला आज मुहूर्त लागला आहे. उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल पदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राम नाईक यांचे वय ८५ झाल्याने त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय भाaजपने घेतला आहे. तर आनंदीबेन पटेल राज्यपाल असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या राज्यपाल पदाची … Read more