माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या स्थानावर, तर पाकिस्तान १३९

thumbnail 1525451286796e0a5ae
thumbnail 1525451286796e0a5ae
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम HELLO महाराष्ट्र : ‘रिपोर्टर्स विदाउट बोर्डर्स’ या संस्थेने केलेल्या पाहणी अहवालातून माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत जगात १३८ व्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. जगभरातील इतर लोकशाही राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीमधील स्थान खुपच खाली घसरले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्या माध्यमांच्या स्वातंत्र्यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सन २०१७ साली प्रकाशित झालेल्या यादीमधे भारत १३६ व्या स्थानावर होता. २०१८ सालच्या अहवालानुसार भारत दोन स्थानांनी घसरला आहे. यावर्षीच्या अहवालानुसार नोर्वे जगात प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल स्विडनचा क्रमांल आहे. माध्यम स्वातंत्र्याबाबत जाहीर केल्या जाणार्या या अहवालात पाकीस्तानचा क्रमांक भारताच्या खालोखाल म्हणजेच १३९ वा आहे तर चीन १७६ व्या क्रमांकावर आहे. बांग्लादेशचा क्रमांक १૪६ वा असून उत्तर कोरियाचा सर्वात शेवटचा १८० वा क्रमांक आहे. रिपोर्टर्स विदाउट बोर्डर्स ही संस्था सन २००२ पासून सातत्याने “प्रेस फ्रिडम रिपोर्ट” प्रकाशित करते. माध्यमांमधील विविधता आणि माध्यमांवरील सरकारचे वर्चस्व तसेच वेगवेगळ्या राष्ट्रांत पत्रकारांना दिली जाणारी वागणूक इत्यादी गोष्टींचा अभ्यास करुन त्यावरुन हा अहवाल बनवण्यात येतो. या वर्षीच्या अहवालात भारताचे जागतिक स्तरावरील स्थान घसरण्याला गौरी लंकेश यांच्या हत्येची पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.