परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
जिल्हातील गोपेगाव येथे माहेरी आलेल्या विवाहित तरुणीने माहेरी वडीलांच्या राहत्या घरी रविवार दि.22 सप्टेबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील मयत राजकन्या अवतसर (वय 20) अस मयत तरूणीच नाव आहे . गोपेगाव येथील महादेव आवतसर यांची मुलगी राजकन्या हिचा विवाह परतुर तालुक्यातील कौठ येथील ऋषी माने यांच्या बरोबर गत वर्षी झाला होता. पण काही दिवसापुर्वी पती आणि पत्नी मध्ये वाद झाल्याने राजकन्या ही आपल्या आईवडीलाकडेच गोपेगाव येथे राहत होती. रविवार दि.22 सप्टेबर रोजी घराच्या आडुस गळफास लावून सदरील तरुणीने आत्महत्या केली. ही घटना काही वेळानंतर मयत मुलीच्या आईने पाहीली.
आत्महत्ये मागील कारण समजु शकले नाही .दरम्यान या घटनेची माहीती पाथरी पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर पाथरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालात आणण्यात आला होता. या घटने प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा सुरु होती.