बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळुरू येथे तिसरा आणि अखरेचा सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच हटके प्रयोग करत आले आहेत. अशाच क्रिएटिव्ह प्रेक्षकाने हातात धरलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.
मी जसप्रीत बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो या अर्थाचे ते पोस्टर होते. प्रेक्षकाने टाकलेल्या या गुगलीवर आयसीसीने आपल्या खास शैलीत उत्तर देत सिक्सर मारला आहे. तु जसप्रीत बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो तर आम्हाला त्याचा व्हिडिओ पुरावा हवा आहे, असे म्हणत आयसीसीने प्रेक्षकाच्या गुगलीवर सिक्सर मारला आहे.
We’d like to see video proof ????#INDvAUS pic.twitter.com/Ti3s0OgkXx
— ICC (@ICC) January 19, 2020
२८७ धावांचे आव्हान
या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ९ बाद २८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी केली. त्याने १३१ धावा केल्या. मालिका विजयासाठी आणि ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखण्यासाठी भारतीय संघाला २८७ धावा कराव्या लागतील. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.