हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 ची सुरुवात उद्याच होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आबु धाबी येथे पहिला सामना होणार आहे. परंतु आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्स संघांचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले आहे.
पाँटिंगने ‘डेंजर मॅन’ म्हणून रोहितचा उल्लेख केला आहे. मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज कोण आहे, हा प्रश्न विचारल्यावर उत्तर देताना पॉंटिंग म्हणाला, “रोहित शर्मा या हंगामात मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो जगातील सर्वात धोकादायक टी20 फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा आयपीएल, त्याची कामगिरी शानदार राहिली आहे.”
रोहितने 2013 मध्ये मुबंई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून पदभार स्विकारल्यापासून या संघाने आयपीएलचे चार विजेतेपद जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सला आयपीएलचा सर्वोत्कृष्ट संघ बनविण्यात रोहित शर्माचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पॉंटिंग म्हणाला, “रोहित त्याच्या कारकिर्दीतील सर्वात शानदार टप्प्यातून जात आहे. त्याला मागे टाकणे सोपे नाही.” असेही पॉंटिंग म्हणाला.
मुंबई इंडिअन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी तब्बल 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.रोहित शर्मा आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.यावर्षी पुन्हा एकदा मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.