‘मोदी तर पेढेवालेसुद्धा’ असं म्हणणार्‍या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान ‘या’ दिवशी सातार्‍यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राज्यात एकुण नऊ सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा सातार्‍यात होणार असल्याचे समजत आहे.

पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी सातार्‍यात येणार असून उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा जिंकणे भाजप साठी प्रतिष्ठेचे बनले आहे.

सातारा येथील सभेनंतर पंतप्रधान मोदी पुण्याकडे रवाना होणार आहेत. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरुड येथून लढण्याने अनेकांचे लक्ष पुण्याकडे लागले आहे.

काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना आमच्याकडे मोदी तर पेढेवालेसुद्धा असं म्हणत पंतप्रधान मोदी यांना हिणवले होते. मात्र आता तेच पंतप्रधान मोदी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातार्‍यात येणार आहेत.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या-

Leave a Comment