हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत आहे. त्यातच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना विरुद्ध शिवसेना असा नवा वाद सुरू झाला. कंगणाने ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यातच केंद्र सरकारने कंगणाला वाय दर्जाची सुरक्षा दिली.
गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं कारण सांगितलं आहे. कंगनाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “कंगना रणौत सोशल मीडियावर तिची मतं मांडत असल्याने महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला. तिला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी” असं निवेदन कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला” अशी माहिती रेड्डी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
Yसुरक्षा म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊ –
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा ज्या व्यक्तींना दिली जाते त्यांच्या सुरक्षेसाठी 11 जवान तैनात असतात. यात 1 किंवा 2 कमांडो, 2 पीएसओ यांचा समावेश असतो. मागील वर्षी केंद्राने 11 पेक्षा जास्त लोकांना Y दर्जाची सुरक्षा दिली होती. ज्यात युपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश होता. म्हणजे आता कंगनासाठी 1 किंवा 2 कमांडो, 2 पीएसओ आणि अन्य जवानांचा समावेश असणार आहे. यात एकूण 11 जवान संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’