हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.
उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन”.
आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’