म्हणून ‘त्या’ व्यावसायिकाने बाजारात आणली नवीन ‘कंगना साडी’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सूरत । मुंबई पोलीस, मुंबई आणि शिवसेनेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणौत सध्य चर्चेचा विषय ठरते. अशा या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ एका चाहत्यानं हटके अंदाजात तिची झलक असणारी साडी तयार केली आहे. मुळच्या सूरत येथे राहणाऱ्या कापड व्यावसायिक रजत दावेर यांनी ही किमया केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘क्वीन’ कंगनाची झलक असणारी साडी साकारली आहे.

या साडीवर कंगना व्यतिरिक्त गणपतीचंही चित्र आहे. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातील तिचा लूक या साडीवर प्रथमदर्शनी पाहायला मिळतो. कंगनाच्या समर्थनार्थ साडी साकारण्यात आल्याची प्रतिक्रिया रजत यांनी साडीबाबत माहिती देताना म्हणाले की, ‘ती कोणा एका गोष्टीचं समर्थन करण्यासाठी म्हणून आपलं मत मांडत होती. पण तिचा आवाज दाबण्यात आला, तिचं कार्यालय तोडण्यात आलं. त्यामुळं आता आम्ही कंगनाचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कंगनाला ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते पाहता रजत यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ही साडी बाजारात येताच लगेचच तिची खरेदी करण्यासाठी अनेकांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. रजत यांनी दिलेल्या माहितीनुसार १००० रुपयांपासून या साडीची किंमत सुरु होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.