Thursday, March 30, 2023

जर FD पेक्षा जास्त व्याज हवे असेल तर येथे करा गुंतवणूक, होईल मोठा नफा कसे ते जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी व्याज असलेल्या सध्याच्या काळात फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) चे व्याजदरही वर खाली होत आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना अडचण अशी येते आहे की, त्यांनी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी जेणेकरून त्यांना त्यांच्या बचतीवर अधिक व्याज मिळू शकेल हे कळेनासे झाले आहे. बचत खात्याचा व्याज दरदेखील 2.7 ते 4.5 टक्क्यांच्या दरम्यान आहे. जर आपणही गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करून कोठे मोठी बचत करू शकाल. आणि यामध्ये तुम्हाला फिक्स्ड इनकम स्कीम्सच्या माध्यमातून अधिक रिटर्न कुठे मिळू शकेल हे जाणून घेउयात.

पब्लिक प्रोविडेंट फंड
सध्या पब्लिक प्रोविडेंट फंडवर गुंतवणूक करणार्‍याला 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. या पीपीएफचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षे आहे. यानंतर आपण ते 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवूही शकता. एखादी व्यक्ती फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकते. पीपीएफ घरी बसूनसुद्धा सहजपणे उघडता येते. यामध्ये सरकारी गारंटेड रिटर्न देखील मिळतो.

- Advertisement -

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम्स
POMIS ला सध्या वार्षिक 6.60 टक्के व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड हा 5 वर्षे आहे. आपण या योजनेचा कालावधी हा 5 वर्षाच्या स्लॅबमध्ये वाढवू देखील शकता. या योजनेत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. परंतु जॉईंट अकाउंटमध्ये या योजनेत 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येईल. मात्र, या योजनेत, मॅच्युरिटी येण्यापूर्वी दंड देखील भरावा लागू शकतो. 10 वर्षे वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकते.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
या योजनेचे वार्षिक उत्पन्न 5.50 ते 6.70 टक्के आहे. या योजनेत गुंतवणूकीचा कालावधी 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांचा आहे. या योजनेत कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक नाही. यात तुम्हाला वार्षिक व्याज मिळेल. या योजनेंतर्गत तुम्ही बँकेत खातेदेखील उघडू शकता.

ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना आहेत जिथून एखाद्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. यातील एक म्हणजे पंतप्रधान वंदना योजना. या पीएमव्हीव्हीवाय अंतर्गत 7.14 टक्के दराने व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजना देखील त्यापैकी एक आहे. या योजनेला 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक सरकारी बॉन्ड्समध्ये देखील गुंतवणूक करु शकतात. या सरकारी बाँडवर 7.15 टक्के व्याज मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.