रत्नागिरी जिल्ह्यात सेना-भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी प्रतिनिधी। राज्यात शिवसेना भाजपाची युती झाल्याचे दोन्ही पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु भाजपाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी दापोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना – भाजपा युतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण ज्या मतदार संघातून शिवसेनेनं एबी फॉर्म भरून दिला आहे. त्याच मतदारसंघात भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत साठे यांच्या नावाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून एबी फार्म देण्यात आल्याने जिल्ह्यात भाजपाला एकही जागा शिल्लक राहिली नाही. याआधी भाजपाला जिल्ह्यातील दोन जागा मिळाव्यात अशी मागणी जिल्हा भाजप कडून होत होती. मात्र सेनेकडून जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आल्याने भाजपाकडून सेनेला शह देण्यासाठी आज दापोली विधानसभा मतदारसंघातुन साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी दापोलीतील मुख्यत्वे लढत शिवसेनेचे सूर्यकांत दळवी विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय कदम अशीच झाली होती. या लढतीत अवघ्या साडे ३ हजाराच्या मताधिक्यानं संजय कदम यांचा निसटता विजय झाला होता. तर भाजपचे केदार शिंदे चौथ्या क्रमांकावर राहिले होते.  मात्र, त्यानंतर शिवसेनेनं इथं चांगलाच जम बसवला. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती झाली असली तरी इथ शिवसेनेचं पारडं जड असणार हे नक्की.