राखी सावंत झाली भावनिक, म्हणाली, फेकलेले अन्न खात आम्ही वाढलो, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : अभिनेत्री राखी सावंत वादग्रस्त विधाने, हटके ऍक्शन आणि बिन्धास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वागण्याची सोशलमिडीयावर मनसोक्त खिल्ली उडवली जाते. बिंधास्त असणाऱ्या राखीच एका शोमध्ये गंभीर आणि भावनिक रूप पहायला मिळालं. राजीव खंडेलवालच्या ‘जज्बात’ शोमध्ये राखी सावंतला तिच्या लहानपणाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळेस बोलताना राखी भावनिक झाली आणि तिचे डोळे पाणावले. या घटनेचा व्हिडोओ राखीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये राजीव म्हणतो की, ‘आज या शोमध्ये कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही. कारण मी आज राखी सावंतशी नाही तर निरू भेडाशी बोलणार आहे.’ स्वतःचं मुळ नाव ऐकून ती थोडी बावचळते आणि नंतर ती मीच आहे असं सांगते. यानंतर राजीव राखीला तिच्या बालपणाबद्दल विचारतो.

यावर राखी म्हणते की, ‘आजही ते दिवस आठवले की माझे हात कापतात. खरं सांगणं तसं फार सोप्पं नाहीये. आम्ही फार गरिबीतून वर आलो आहोत. जेव्हा मी आईच्या पोटात होते तेव्हा आई दगड, विटांवर स्वयंपाक करायची. आई सांगायची की, जेव्हा आमच्याकडे खायला काही नसायचं तेव्हा बाजूच्यांनी फेकलेलं अन्न आम्ही खायचो. माझी आई एका रुग्णालयात आया म्हणून काम करायची.’ यानंतर राखी रडू लागली.

हा व्हिडीओ जुना असून राखी सावंतने आता तो शेअर केला आहे. तसेच हा व्हिडोओ सोशलमिडीयावर व्हायरल देखील होत आहे.

https://www.instagram.com/tv/B7cu8z1nnW-/?utm_source=ig_web_copy_link