टीम, HELLO महाराष्ट्र | अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काल मंगळवारी सुनावणी करण्यात आली. या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांनी राम जन्मभूमीचे महत्व मान्य करत, मंदिराला जागा देण्यासाठी सकरात्मक असल्याचे स्पष्ट केले. राम लल्ला चे वकील सी.एस वैद्यनाथन यांनी असा दावा केला की वादग्रस्त जागेवर मशीद तयार करण्यासाठी मंदिर पाडले गेले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) खात्याने केलेल्या उत्खननानुसार तेथे एक मंदिर होते. त्यानंतर त्याजागी मशिद बांधली गेली. तत्पूर्वी त्याखाली एक विशाल बांधकाम होते.
दरम्यान खंडपीठातील न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांच्या प्रकृती बिघडल्यामुळे सोमवारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांचे खंडपीठ 6 ऑगस्टपासून या खटल्याची सुनावणी दररोज करीत आहेत.
या खटल्याची सुनावणी करणाऱ्या खंडपीठात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. वाटाघाटीद्वारे हा वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये मध्यस्त लवाद समितीची स्थापन केली होती. परंतु या प्रकरणावर त्यांच्याकडून कुठलाही तोडगा निघाला नव्हता. नंतर कोर्टाने दररोज सुनावणी सुरू करत निकाल येईपर्यंत ही सुनावणी चालेल.