लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या माॅडेलचा प्रियकरानेच केला होता खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या वीस वर्षीय माॅडेलचा डोक्यात दगड घालून खून करणार्‍यास अखेर पोलीसांनी अटक केलीय. सदर मोडेलच्या प्रयकरानेच तिचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, खुशी परिहार असे मृत मोडेलचे नाव आहे. अशरफ शेख (वय २८) नावाच्या युवकासोबत खुशी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. आपल्या सोबत रिलेशनशिप मध्ये असताना तिचे दुसर्‍या कोणाबरोबर तरी अफेअर आहे अशी शेख याला शंका होती. यातूनच त्याने खूशीची हत्या केली असल्याचं म्हटलं जातंय.

खुशीला माॅडेलिंगची आवड होती. तीने तिच्या घरच्यांसोबत संबंध तोडले होते. दरम्यान तिची शेख याच्यासोबत ओळख झाली. मागील सहा महिण्यांपासू ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात सतत वाद होत होते. अखेर वादाचे रुपांतर खूनामध्ये झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave a Comment