विशेष प्रतिनिधी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सर्वसामान्य माणूस आज अगदी सहजपणे जगासमोर आपले विचार मांडू शकतो. सोशल मीडियाचे फायदे जसे आहेत, तसे अनेक तोटे ही आहेत. आपण याचा वापर कसा करतोय, यावर ते अवलंबून असते. भारतासह जगभरात फेसबुक, इंटस्टाग्राम, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप क्रेझ आहे. या प्लॅटफॉर्म वरून सर्वसामान्यांसह, सिलेब्रिटी, नेतेमंडळीही जगभरात संवाद साधत आहेत. या अँप्सच्या माध्यमातून आपले विचार, मत, आणि अगदी वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी देखील शेअर केल्या जातात . गुगल प्ले स्टोअर मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त इन्स्टॉल केले जाणारे हे ऍप होते. या अँपची क्रेझ अद्यापही कमी झाली नसली, तरी या शर्यतीत टॉक-टॉकने उडी घेतल्यानंतर कमी वेळात सर्वात जास्त इन्स्टॉल केले जाणारे हे अँप ठरले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा अशा अँप पेक्षा टिकटॉकचे फिचर बरेच वेगळे आहे.
टिक-टॉकमध्ये सामान्यांना आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवता येते. यामध्ये नवीन जुन्या वेगवेगळ्या भाषेतील गाणी आणि डायलॉग्सवर युझर केवळ लिपसिंक करतो. अभिनेत्यांचे फेमस डायलॉग्स, लेटेस्ट गाणी, सुविचार यांसह अनेक जण आपल्या स्वतःच्या आवाजात देखील ब्युटी टिप्स, कूकिंग टिप्स, इंग्लिश स्पिकिंग असे अनेक व्हिडीओ अपलोड करत असतात. विशेष म्हणजे ठराविक फॉलवेर्सचा टप्पा आणि लाइक्स मिळवल्यानंतर त्यातून पैसे देखील कमावता येतात. टिकटॉकची क्रेझ पाहता यावर आता अनेक बॉलिवूड स्टार्स आणि मराठी कलाकार देखील व्हिडीओ उपलोड करतात. अँपच्या शर्यतीमध्ये सध्या टिकटॉकने फेसबुक आणि इंस्टा देखील मागे टाकले आहे . सप्टेंबर २०१९ पर्यंत ६० मिलियन लोकांनी हे अँप इन्टॉल केले आहे. सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार २०१९ मध्ये टिक-टॉक सर्वाधिक इन्स्टॉल करण्यात आले आहे .