विजया बँकेवर सशस्त्र दरोडा, विरोध करणार्‍या बँक अधिकार्‍याची गोळी झाडून हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी

रावेर तालुक्यातील निंबोल येथिल विजया बँकेवर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडलीय. भरदुपारी दरोडेखोरांना विरोध करणार्‍या बँक अधिकार्‍यावर गोळीबार करुन चोरटे पसार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय.

हाती आलेल्या माहितीनुसार, विजया बॅकेच्या शाखेवर अडीच वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी चोरटयांना बँक अधिकारी करण नेगे यांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांच्या छातीत बंदूकीच्या दोन गोळया झाडल्या. एका कर्मचाऱ्याने तत्परता दाखवत यावेळी सायरन वाजवल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

सायरन आवाज ऐकून मसाकाचे व्हा. चेअरमन भागवत पाटील, मोहन पाटील, पं.स. सदस्य जितु पाटील यांनी बॅकेकडे धाव घेतली. मॅनेजर करण नेगे यांना उचलून रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Comment