नाशिक प्रतिनिधी | नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने वादाच्या भोव-यात सापडत आहेत, त्यातच भर म्हणून शिंदे टोल नाक्यावर दुचाकी चालकाकडुन शंभर रुपयांची नोट स्विकारतांनाचा पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
शिंदे येथील टोलनाक्यावर कार्यरत असणा-या पोलीसांनी दुचाकी चालकाची चावी काढुन घेऊन दोनशे रुपयांची मागणी केली, परंतु दुचाकी चालकाने शंभर रुपयांची तोडी करायची ठरवून दुचाकी चालकाकडून शंभर रुपये स्विकारुन गाडीची काढुन घेतलेली चावी परत करतांना पोलीस अधिकारी व्हिडीओत दिसत आहे. सदर अधिकारी पूर्वी याच भागातील वाहतुक शाखेत काम करत असल्याचे बोलले जाते. निवृत्तीजवळ आलेल्या या अधिका-यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.