शिवानीने बिग बॉस जिंकावा म्हणून फॅन्सने केला लालबागच्या राजाला नवस

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली आणि तिकीट टू फिनाले मिळालेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेचा तिच्या चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. मात्र, यात एका फॅनने चक्क तीने बिग बॉसचा शो जिंकावा यासाठी एक नवस केला आहे. सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो, “ शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला अनवाणी जाणार आहे तसेच दर शुक्रवारी उपवास देखील करणार आहे.”

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस मराठीत आता टॉप ६ मध्ये पोहचलेल्या शिवानीचा चाहता वर्ग अफाट आहे. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उरण, मुंबई अश्या कितीतरी ठिकाणच्या चाहत्यांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केला आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक असे सगळ्या वयोगटातले निस्वार्थ प्रेम करणारे तिचे चाहतेआहेत.

रायगड जिल्ह्यातल्या केगाव मध्ये राहणारा शिवानीचा जबरा फॅन निनाद म्हात्रे जो गाडीवर ‘शिवानी स्टाईल’ स्टिकर लावल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने शिवानीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी परत एकदा खूप मेहनत घेतली आहे. तो राहत असलेल्या गावात कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. तरी शिवानीसाठी खास शहरात जाऊन वाढदिवसाच्या दिवशी सकाळी निनाद केक, ग्रिटिंग कार्ड घेऊन आला. त्याने शिवानीसाठी खास पत्र लिहिलंय. वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा केल्यावर निनाद म्हणाला, “मी शिवानी सुर्वेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या प्रेमापोटीच मी माझ्यासारख्या चाहत्यांचा शिवानीयन्स हा ग्रुप बनवला आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची ट्रॉफी शिवानीनेच जिंकावी अशीआम्हा सर्व चाहत्यांची इच्छा आहे. ती बिग बॉस जिंकल्यावर तिचा ट्रॉफी हातात घेतलेला मोठा फोटो मी माझ्या घराच्या भिंतींवर लावणार आहे. तिला वाढदिवसासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हा सर्व चाहत्यांकडून शुभेच्छा. ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here