मुंबई | शेअर बाजारात आज हाहाकार माजला आहे. तब्बल एक हजार अंकांनी बाजार गडगडला आहे. अवघ्या पाच मिनिटात गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारी रुपयाची स्थिती वधारल्याने शेअर बाजार स्थिरावलेला होता, पण गुरुवारी ही स्थिती पुर्णच बदलली.
निर्देशांक आज गुरुवारी ६९७.०७ अंकांनी म्हणजेच २.०१ टक्क्यांनी कोसळून ३४,०६३.८२ वर उघडला. पण बाजारातल्या मंदीचं वातावरण इतकं जोरावर होतं की बाजार सुरू होताच १ हजार हून जास्त अंकांनी कोसळला. ९.२२ वाजता सेन्सेक्स १००१.३१ म्हणजेच २.८८ टक्के घटून ३३,७५९.५८ वर पोहोचला. दुसरीकडे, डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र आज ७४.४७ च्या विक्रमी स्तरावरून खाली आला आहे. व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब करा सुरुवातीच्या कामकाजात सेन्सेक्सच्या ३१ पैकी ३० शेअर्सची विक्री होत होती. केवळ एक शेअर मजबूत होता. निफ्टीचे ५० पैकी ४६ शेअर कोसळले, केवळ ४ शेअर्सची खरेदी होत होती.