हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या साई बाबा यांच्या जन्मभूमीचा वाद अजून थांबायच नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्ती नंतर देखील पाथरी ग्रामास्थांचे समाधान झालेले नाही. आता या प्रकरणाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. साई जन्मभूमी पाथरी संस्थानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात हा जन्मभूमी वाद गेल्यामुळे हे प्रकरण अजूनच वाढण्याची शक्यता आहे. साई जन्मभूमी प्रकरणावर वादावर पडदा टाका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र त्यांच्या या सबुरीच्या आवाहनाला साई भक्तांकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
Sai Janmabhoomi Pathri Sansthan to approach Bombay High Court over Sai Baba birthplace controversy. #Maharashtra
— ANI (@ANI) January 23, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पाथरीला साई जन्मभूमी म्हणून विकासासाठी १०० कोटींचा निधी जाहीर केला. येथूनच वादाला ठिणगी पडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांचा जन्म परभणी जिल्ह्यातील पाथरीचा की नगर जिल्ह्यातील शिर्डीचा असा हा वाद आहे. पाथरीचे ग्रामस्थ साई बाबांचा जन्म पाथरीचाचा असल्याचा दावा करत आहेत. तसेच यासाठी ते २७ पुराव्यांचा दाखला देत आहेत. आता हा वाद उच्च न्यायालयात गेल्यामुळे या वादाला नवीनच वळण मिळण्याची शक्यता आहे.