साताऱ्यात विविध भागात मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापे; अन्य भागातले पोलीस मात्र थंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख व त्यांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापे मारले. सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत मारलेल्या २ तासांच्या छाप्यात तब्बल ५७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी यावेळी साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मटका व्यावसाईकांना जोरदार झटका बसला आहे. सातारा जिल्ह्यातील पोलीस मटका विरुद्ध सक्रिय असले तरि जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील पोलीस मात्र अद्याप थंडच असल्याचे पहायला मिळत आहे.

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांसह सचिन रिटे, अमोल बागल, प्रशांत शिंदे, उज्वल कदम, बालम मुल्ला, दादासो बनकर, मंगेश डोंबे यांनी सहभाग घेतला.