मुंबई । राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. अशा वेळी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनानं यावर्षी सोयाबीनसाठीचा हमी भाव जाहीर केला आहे. राज्य शासन सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार असल्याचे राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगितलं आहे. याशिवाय १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
बाळासाहेब पाटील यांनी ट्विटरवर एक याबाबत माहिती दिली आहे. यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला असून काही भागात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. राज्यातील सोयाबीन पिकाची काढणी आणि मळणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं राज्य शासनाने राज्य शासनाने सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव जाहीर केला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील. शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केलं आहे.
सोयाबीनसाठी राज्य शासन यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार, येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये, शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच सोयाबीनची विक्री करावी- पणन मंत्री @Balasaheb_P_Ncp यांचे आवाहन pic.twitter.com/MaB5nw3uF7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 5, 2020
दरम्यान, काही शेतकरी सोयाबीन विक्रीची घाई करत आहेत. बरेच जण खासगी व्यापाराला आपला सोयाबीन विकत आहेत. राज्यात अजूनही काही भागात पाऊस असून त्यामुळं दाण्यात ओलं कायम राहत असल्याने सोयाबीनची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाई न करता. येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनचं सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”