पुणे | सोरॉसिसवर होमिओपॅथी उपचार प्रभावी असून कुठल्याही दुष्परिणामांविना व नैसर्गिक आणि सुरक्षित उपचारपध्दतीने तणावमुक्त जीवन रूग्ण जगू शकतात. पुण्यात नुकतेच डॉ.बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक व चेअरमन इमिरिटस डॉ.मुकेश बत्रा यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 125 दशलक्ष व्यक्ती सोरॉसिस या गंभीर आजाराने ग्रस्त असून ही आज एक गंभीर समस्या बनत चालली आहे. इंडियन जर्नल ऑफ डरमॅटोलॉजी, व्हेनेरियोलॉजी व लेप्रोलॉजी अनुसार त्वचेची समस्या असलेल्यांपैकी 1 ते 3 टक्के भारतीयांना सोरॉसिस आहे.तीव्र किंवा दीर्घकालीन सोरॉसिस हे अॅलोपेशिया, आरीआटा, सेलियाक, स्क्लेरोडर्मा, लुपससारख्या स्वयंप्रतिरोधक रोग सूचित करू शकते. सोरॉसिसने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या जीवनामधील गुणवत्तेवर होणारा नकारात्मक प्रभाव कर्करोग किंवा मधुमेहाइतकाच असतो. त्यामुळे सोरॉसिसचा उपचार हा फक्त सोरॉसिसच्या लक्षणांपर्यंत सीमित न राहता रूग्णांचे जीवनमान उंचावण्यावर देखील केंद्रीत पाहिजे.
क्लिअर अबाऊट सोरॉसिस या जागतिक सर्व्हेनुसार सोरॉसिसच्या रूग्णांना समाजामध्ये भेदभाव व अपमानांना सामोरे जावे लागते. सोरॉसिस झालेल्या 54 टक्के लोकांना वाटते की, त्यांच्या कामकाजावर याचा प्रभाव पडला आहे. 43 टक्के लोकांना त्यांच्या नातेसंबंधावर प्रभाव पडला आहे असे वाटते, तर 38 टक्के लोकांना मानसिकरित्या प्रभाव पडल्याचे निदान झाले आहे. सोरॅसिस हे फक्त आपल्या त्वचेवर प्रभाव पाडत नाही तर त्याचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आर्थिक, सामाजिक, शारीरिक व भावनात्मक परिणाम होऊ शकतो. होमिओपॅथीद्वारे फक्त सोरॉसिसवर उपचार होतातच पण त्याचबरोबर ताण कमी करण्यात,निराशा कमी करण्यात व आत्मविश्वास वाढविण्यात देखील मदत होते.
सोरॉसिसने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या जीवनमानावर होमिओपॅथीचा पडणारा सकारात्मक प्रभाव प्रमाणित करण्यासाठी डॉ.बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अक्षय बत्रा यांनी साऊत आफ्रिका येथील केपटाऊन येथे नुकत्याच झालेल्या 73 व्या लिगा मेडिकोरम होमिओपॅथिका इंटरनॅशनालिस (एलएचएमआय) मध्ये या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. भारतातील 5 शहरांतील 10 ते 60 वयोगटातील सोरॉसिसने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर याचा अभ्यास करण्यात आला होता.यानुसार होमिओपॅथीद्वारे सोरॉसिसवर प्रभावी उपचार करता येतातच पण त्याचबरोबर जीवनाच्या गुणवत्तेवर देखील सकारात्मक परिणाम होतो. डॉ.बत्राजने आजवर त्वचेचे विकार असलेल्या तीन लाखहून अधिक रूग्णांवर उपचार केले आहेत. त्यात 94.3 टक्के यश मिळाले असून अमेरिकन क्वालिटी असेसर्स ने हे प्रमाणित केले आहे.