सोलापूर प्रतिनिधी। राजकारणात कधी कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक भन्नाट प्रकार आज सोलापूरमध्ये पाहायला मिळाला. बशीर अहमद शेख नावाच्या उमेदवाराने चक्क घोड्यावर बसून सोलापूर शहर मध्य जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पराक्रम केला आहे.
सोलापूर मध्य मतदारसंघ तसा चर्चेतील मतदारसंघ. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार यांची कन्या प्रणिती शिंदे येथील विद्यमान आमदार. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असत. त्यात आता बशीर शेख यांची भर पडली आहे. यदा कदाचित मी जर निवडून आलो आणि राज्याचा गृहमंत्री झालो तर दाऊदला भारतात आणणार असल्याचा दावा ही या महाशयांनी केला आहे.
या अगोदर यांनी उंटावर उमेदवारी अर्ज भरला होता, येत्या काळात हत्तीवरून उमेदवारी अर्ज भरण्याचा मानस सुद्धा बशीर शेख यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात प्राण्याचा वापर केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा ही दाखल झाला आहे.