मुंबई | राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या डिसेंबर मध्ये पार पडणार आहेत. यामध्ये धुळे, अहमदनगर महानगरपालिकेच्या तर नेर- नबाबपूर , लोहा , मौदा , रिसोड, ब्रम्हपुरी आणि शेंदुर्णी या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी निवडणुका होतील.
अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबरला मतदान होईल तर या १० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी जाहिर केले.
धुळे, अहमदनगर महानगरपालिकेच्या तर नेर- नबाबपूर , लोहा , मौदा , रिसोड, ब्रम्हपुरी आणि शेंदुर्णी या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबरला मतदान. १० डिसेंबरला मतमोजणी. निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची घोषणा pic.twitter.com/2tYcp9IPmt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 1, 2018